राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता तपासाला वेग आला आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानातला फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, विमानातल्या दोन्ही रेकॉर्डर्सवर भीषण अपघाताचा परिणाम झाला आहे. अपघातानंतर आगीत ब्लॅक बॉक्स दिर्घकाळ उच्च तापमानात राहिल्याने त्यातील दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान झाले आहे असं सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा- Rohit Pawar : "ब्लॅक बॉक्स जळला कसा? आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम...", रोहित पवार विलिनीकरणावर स्पष्टच बोलले
अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया एक्सवर अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा विमानाचा एक फोटो पोस्ट केला. ज्यात विमानाच्या टेलकडे बोटाचे इमोजी दाखवत ब्लक बॉक्स अपघातानंतरही सुरक्षित असल्याचे दाखवले आहे. "विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाचीटेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉस असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?" असा प्रश्न उपस्थित करत अमोल मिटकरी यांनी पोस्टमध्ये ब्लक बॉक्ससंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.