प्रतिनिधी, अमरावती
नुकताच आईच्या गर्भातून बाहेर आल्यावरच या बाळाचा संघर्ष सुरू झाला. शरीर आणि ओली नाळ अश्या अवस्थेत दिसून आला. गावाबाहेर कचऱ्यात नवजात बालक मृत अवस्थेत आढळून आले.
बडनेरा परिसरातील जुनी वस्ती येथील अलमास कॉलनीजवळील एका छोट्या ओपन प्लॉटमध्ये नवजात अर्भक शिशु मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेता फॉरेन्सिक टीम तसेच डॉग पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून त्यांनी तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे.
नवजात शिशुचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तसेच या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास बडनेरा पोलीस करत आहेत.