Thursday, July 17, 2025 02:27:59 AM

'औरंगजेब खूप पवित्र व्यक्ती'; माजी आमदार आसिफ शेख यांचां वादग्रस्त दावा

अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य ताजं असताना मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील अबू आझमींप्रमाणे औरंगजेबाची स्तुती केली आहे. आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेला उधाण मिळालं आहे.

औरंगजेब खूप पवित्र व्यक्ती माजी आमदार आसिफ शेख यांचां वादग्रस्त दावा

मालेगाव: रविवारी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पालखी सोहळ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच, अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य ताजं असताना मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील अबू आझमींप्रमाणे औरंगजेबाची स्तुती केली आहे. आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेला उधाण मिळालं आहे.

हेही वाचा: अबू आझमींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

माजी आमदार आसिफ शेख म्हणाले:

'औरंगजेब खूप पवित्र व्यक्ती होते. औरंगजेबांनी नेहमी स्वत:ची टोपी शिवून त्यांच्या दोन वेळच्या जेवणासाठी कमाई केली. औरंगजेब सर्व धर्म आणि समाजाचा आदर करायचे. फक्त राजकारणासाठी त्यांना बदनाम करायचं आणि त्यांच्या नावाने मतं घेण्याचं राजकारण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलं आहे', असं वादग्रस्त वक्तव्य आसिफ शेख यांनी केलं आहे.

हेही वाचा: अबू आजमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल मिटकरी आणि एकनाथ खडसे काय म्हणाले?

औरंगजेबबाबत अबू आझमी म्हणाले:

काही महिन्यांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीदेखील औरंगजेबवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अबू आझमी म्हणाले होते की, 'मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. औरंगजेबाच्या काळात भारताच्या सीमा या अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24% एवढा होता. भारताला त्यावेळी सोने की चिडिया म्हटलं जायचं. असे असताना चुकीचं म्हणू का?'.

त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील वातावरण तापलं होतं. जेव्हा अबू आझमी यांच्या विधानामुळे राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता, तेव्हा त्यांनी त्यांचे विधान मागे घेतले. 'आपल्या वक्तव्याला मोडून तोडून दाखवण्यात आलं. त्याचा विपर्यास करण्यात आला', असं स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिलं. अशातच, काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी नुकताच औरंगजेबाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांची काय प्रतिक्रिया येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री