Bacchu Kadu Protest: शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरुन प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तथापी, कार्टाने बच्चू कडू यांना संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जागा रिकामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आंदोलनस्थळी आले होते. मात्र, आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांना तेथून माघारी परतावं लागलं. तथापी, आता हजारो समर्थकांसह बच्चू कडू यांनी पोलीस बंदोबस्ताकडे कुच केली असून आंदोलनस्थळ सोडलं आहे. ते हजारो समर्थकांसह पोलीसांसोबत रवाना झाले आहेत.
15 लाख लोकांशी साधला थेट संपर्क
दरम्यान, बच्चू कडू यांच्या राज्यव्यापी जनआंदोलन मोहीमेने आता चांगलाचं जोर पकडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी 45 दिवसांत तब्बल 8200 किलोमीटर प्रवास करत, राज्यातील 33 जिल्ह्यांतील 93 सभा घेतल्या आणि सुमारे 15 लाख लोकांशी थेट संपर्क साधला. कडू यांच्या या भव्य मोर्चामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समर्थकांच्या मोठ्या संख्येमुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - कोर्टाच्या आदेशानंतरही बच्चू कडू आंदोलनावर ठाम, संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांनाही माघारी पाठवलं
काय आहेत बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या
1. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्वरित जाहीर करावी.
2. शेतमजूर, मच्छीमार, मेंढपाळ अशा घटकांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ किंवा त्याच्या समतुल्य यंत्रणा स्थापन करावी.
3. दिव्यांग व्यक्तींना मासिक मानधन 6000 हजार द्यावे.
4. ग्रामीण भागात घरकुलासाठी आणि इतर लाभार्थ्यांसाठी कमीतकमी 5 लाख अनुदान द्यावे.
5. समाज विशेषतः धनगर समाज यांना आरक्षण द्रुत प्रभावाने लागू करावे.
6. पिक विशेषतः धानधान्य उत्पादनासाठी हमीभाव सुनिश्चित करावा.
7. लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेती कामांचा समावेश करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना योजनेमध्ये वाढ किंवा त्याऐवजी एकरी 10,000 मदत द्यावी.
8. दुधातील भेसळ रोखण्यासाठी नियम करावा; गायीच्या दुधाला 50/लिटर, म्हशीच्या दुधाला 60/लिटर असा दर निश्चित करावा.
9. ऊस उत्पादनासाठी 2025-26 साली प्रति टन 4,300 दर + पुढील 11 टक्के रिकव्हरीसाठी 430 दर असावा.
10. निर्यात-बंदी किंवा दर निश्चिती अशा उपायांनी कांद्याचे दर नियंत्रित करावेत.
हेही वाचा - Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या आंदोलनावर न्यायालयाची कारवाई! सायंकाळपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचा आदेश
या आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे की शेतकरी, दिव्यांग आणि ग्रामीण घटकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, हे आंदोलन आगामी राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकू शकते.