मुंबई: सुरक्षेच्या उपाययोजना लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी 3 जूनपर्यंत संपूर्ण शहरात ड्रोन आणि इतर रिमोट-कंट्रोल्ड फ्लाइंग उपकरणांच्या वापरावर कडक बंदी घातली आहे. बृहन्मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ही बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मुंबईला ड्रोन ऑपरेशन्ससाठी 'रेड झोन' म्हणून घोषित केले आहे, ज्या अंतर्गत अनधिकृत ड्रोन उडवणे हे गंभीर उल्लंघन मानले जाते. या निर्देशाला न जुमानता, रविवारी मुंबईतील पवई परिसरात एका 23 वर्षीय तरुणाला ड्रोन उडवताना पकडण्यात आले. या घटनेनंतर, संबंधित कलमांखाली त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - न्यायमूर्ती भूषण गवई बनले भारताचे 52 वे सरन्यायाधीश! राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली शपथ
मुंबई शहरात खालील डिव्हाइसेसवर बंदी -
ड्रोन
रिमोट-नियंत्रित मायक्रोलाईट विमान
पॅराग्लायडर
पॅरामोटर
हँड ग्लायडर
गरम हवेचा फुगा
हवाई उपकरण
हेही वाचा - मुंबईत वळवाच्या पावसाची हजेरी; उपनगरात विजांच्या कडकडाटासह पाऊस
दरम्यान, मुंबई पोलिसांचे डीसीपी (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी यासंदर्भात नागरिकांना सूचना दिल्या असून लोकांच्या सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेमुळे सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी तात्पुरती बंदी घालण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.