Monday, May 11, 2026 11:56:20 AM

Sunetra Pawar Win : बारामतीकरांचं अजूनही दादांवर प्रेम! सुनेत्रा पवार 2 लाख मतांनी विजयी; देशातील सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड ब्रेक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय झाला आहे.

sunetra pawar win  बारामतीकरांचं अजूनही दादांवर प्रेम सुनेत्रा पवार 2 लाख मतांनी विजयी देशातील सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड ब्रेक

बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय झाला आहे. बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना 2,18,930 मतांनी विजयी केलं आहे. यामुळा हा देशातील सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड असल्याचे समजते. यापूर्वी 2022 मध्ये उत्तर प्रदेशमधील सुनीलकुमार शर्मा यांनी 2,14,835 मत मिळवून सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड कायम केला होता. मात्र आता सुनेत्रा पवार यांनी हा रेकॉर्ड ब्रेक करत सर्वाधिक मतांनी विजय होण्याचा मान पटकावला आहे. या माध्यमातून बारामतीकरांनी जसं अजितदादावर प्रेम केलं तसाच विश्वास त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावरही दाखवल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा : Baramati Bypoll Election Result: बारामतीत सुनेत्रा पवारांची ऐतिहासिक झेप; 15 व्या फेरीतच अजित पवारांचा रेकॉर्ड मोडत प्रस्थापित केला नवा विक्रम

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या, "या मतदानाच्या माध्यमातून जनतेने दादा (अजित पवार) यांच्यावर आपला विश्वास, प्रेम आणि सहानुभूती दाखवली आहे..." 

संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 15 व्या फेरीपर्यंतच त्यांनी असा टप्पा गाठला आहे, जो आजवर अजित पवारांनाही गाठता आला नव्हता. रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळवतं दादांनाही मागे टाकलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 1,01,000 मतांच्या फरकाने विजय मिळवत विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी 218930 मतांनी विजय मिळवून हा विक्रम इतिहासजमा केला. अजित पवारांच्या विक्रमी मताधिक्याला मागे टाकत सुनेत्रा पवारांनी बारामतीवर आपली पकड घट्ट केली आहे.


सम्बन्धित सामग्री