बारामती पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याची नजर आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी संपूर्ण पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतला असला तरीही अद्याप २५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यात धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा यांचा समावेश आहेत.
नक्की घडतंय तरी काय?
अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची विधानसभेची जागा रिकामी झाली होती. सुनेत्रा पवार या जागेवरून निवडणूक लढणार हे निश्चित होतं. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत. पण, अपक्षांना शांत करण्यात पक्ष आणि पवार कुटुंबीय कमी पडत आहेत. त्यामध्ये काँग्रेसने सुद्धा आपला उमेदवार उतरवला होता. परंतू हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन केल्यामुळे काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यात पवार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा Arvind Sawant : 'मला उभा चिरला तरी ठाकरेंशी गद्दारी करणार नाही...'; खासदार फुटीच्या बातम्यांवर अरविंद सावंत यांचा संताप
लोकसभेत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा संघर्ष
2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीच्या जागेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कारण, पवार कुटुंबातचं संघर्ष टोकाला पेटला होता. महायुतीत बारामतीची जागा अजित पवारांना तर मविआमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली होती. त्यामध्ये दादांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार तर शरद पवारांनी खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिली होती. नणंद आणि भावजय एकमेकांच्या समोर असल्यामुळे बारामतीचं राजकीय वातावरण बदलून गेले होतं. दादा आणि शरद पवारांमध्ये शाब्दिक वार-पलटवार सुरूच होते. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा 1,58,333 मतांनी पराभव केला.
दादांच्या निधनानंतर पवार कुटुंब एकत्र
28 जानेवारी 2026 अजितदादांचं विमान अपघातात निधन झालं. संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजितदादा आपल्या शिस्तीसाठी आणि आपल्या ठाम निर्णयामुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध होते. पण बारामतीचे प्रतिनिधी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांची जागा भरून काढणे अतिशय कठीण आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर पहिल्यादाचं पवार कुटुंब एकत्र आले आहे.
बारामतीच्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळे काय बोलल्या?
दादांचं अकाली निधन आणि निर्माण झालेली पोकळी त्यामुळे बारामतीची जागा रिक्त झाली होती. त्यात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आमदार होणं अतिशय आवश्यक होतं. त्यामुळे बारामतीची पोटनिवडूक लागल्यांनंतर सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. पवार कुटुंबातील एकही व्यक्ती यावेळी उपस्थित नव्हता.
सुप्रिया सुळेंना जेव्हा माध्यमांनी प्रश्न विचारला तुम्ही वहिनींचा प्रचार करणार का?, तेव्हा सुप्रिया सुळेंनी हसून उत्तर दिलं..,'मला वहिनींनी प्रचाराला बोलावलं तर मी नक्की प्रचाराला जाणार'. सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार की नाही, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.