Monday, March 09, 2026 07:52:17 AM

Baramati Zilla Parishad Eletion 2026: काटेवाडीत पवार कुटुंबीयांनी केले मतदान; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामतीतील काटेवाडी येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.

baramati zilla parishad eletion 2026 काटेवाडीत पवार कुटुंबीयांनी केले मतदान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना, बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे पवार कुटुंबीयांनी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी काटेवाडी येथे येऊन शांततेत मतदान केले. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही दरवेळी सकाळी लवकर मतदानासाठी हजर राहत असत, अशी आठवण यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

दुःखाच्या सावटात प्रचार, तरीही मतदानावर भर

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये प्रचार अतिशय संयमित आणि शांततेत पार पडला होता. दुःखाचे वातावरण असतानाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावत “लोकशाही प्रक्रियेत सहभाग महत्त्वाचा आहे,” असे अधोरेखित केले. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधि नवनाथ बोरकर यांनी दिली आहे. 

हेही वाचा: Rantnagiri Panchayat Samiti Election 2026: रत्नागिरीचा 'कौल' कोणाला? 56 गट आणि 112 गणांसाठी आज रणसंग्राम; उदय सामंत, भास्कर जाधवांसह 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

बारामतीत शांततेत मतदान

बारामती तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून, प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदारही मोठ्या संख्येने मतदान केंद्रांकडे वळताना दिसत आहेत. बारामती हा दिवंगत अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दीर्घकाळ राहिले आहे. त्यामुळे आजच्या मतदानाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

राजकीय आणि वैयक्तिक दुःखाच्या पार्श्वभूमीवरही पवार कुटुंबीयांनी मतदान करून लोकशाहीप्रती त्यांची बांधिलकी दाखवली. बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून, निकालानंतर स्थानिक राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: Mumbai Local Mega Block: मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी 'मेगाब्लॉक'; प्रवाशांनो प्रवास करताना वेळापत्रक बघाच


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या