बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची माहिती समोर येताच राज्यभरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत ‘उद्ध्वस्त’ असे WhatsApp Status ठेवले आहे.
घटनेची माहिती मिळताच सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या तातडीने बारामतीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. सुप्रिया सुळे या संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीकडे जात असताना, प्रवासादरम्यानच त्यांना या दुर्घटनेची माहिती मिळाली. बातमी समजताच त्यांनी आपला नियोजित प्रवास तात्काळ थांबवत माघारी बारामतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात भावा बहिणीचे भावनिक नाते होते.
हेही वाचा: Eknath Shinde on Ajit Pawar Death: ‘निर्भय, स्पष्टवक्ते आणि प्रशासनावर मजबूत पकड’; एकनाथ शिंदेंची अजित पवारांना भावनिक श्रद्धांजली
अजित पवार यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण राजकीय क्षेत्रात दुःखाची लाट पसरली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या जात असून, सामाजिक माध्यमांवरही भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा: Ajit Pawar Death: अजित पवार यांची सदैव आठवण राहील! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भावनिक श्रद्धांजली