छत्रपती संभाजीनगर: संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचे आज भीमा स्नान करण्यात आले. भीमा नदीत 'भानुदास एकनाथ'च्या जयघोषणा देण्यात आल्या. पैठण येथून येणारा संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पायी वारी करत आहेत. सुमारे साडेतीनशे वर्षाहून अधिक काळापासून पायी पालखी सोहळा ही परंपरा सुरू आहे. नाथांच्या रथासमोर पाच दिंड्या तर रथाच्या पाठीमागे 30 जिल्ह्यातील वारकरी आहेत. होळे मुक्काम आटोपल्यानंतर संत एकनाथांच्या पालखीचे भीमा नदीवर बांधण्यात आलेल्या नाथसेतूजवळ आगमन झाले. संत एकनाथांच्या पादुकांना भीमा नदीमध्ये विधिवत पूजा करून भीमा स्नान घालण्यात आले. त्यानंतर चंद्रभागेच्या किनारी आरती होऊन पालखीने प्रस्थान केले.
शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे आज भीमा स्नान
पंढरपूरच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पैठण येथून येणाऱ्या श्री शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे आज भीमा स्नान करण्यात आले. भीमा नदीत"भानुदास एकनाथ"च्या जयघोषाने अवघा भीमातीराचा आसमंत दुमदुमून गेला. पंढरीच्या आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक संतांच्या पालख्या येत असतात. यामध्ये प्रामुख्याने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या पायी वारी करत आहेत. त्याचबरोबर मानाच्या पालख्यापैकी पैठण येथून येणाऱ्या संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पायी वारी करत आहे. सुमारे साडेतीनशे वर्षाहून अधिक वर्षाची पायी पालखी सोहळा ही परंपरा सुरू आहे.
हेही वाचा : Uddhav Thackeray: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी...
या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 25 हजाराहून अधिक वारकरी पायी वारी करत आहेत. नाथांच्या रथासमोर पाच दिंड्या तर रथाच्या पाठीमागे 30 जिल्ह्यातील वारकरी आहेत. तर संत बलभीम बाबा या पालखी सोहळ्याला अनेक वर्षाची परंपरा असून यामध्ये पाच हजारांहून अधिक वारकरी पायी वारी करत आहेत. होळे मुक्काम आटोपल्यानंतर संत एकनाथांच्या पालखीचे भीमा नदीवर बांधण्यात आलेल्या नाथसेतुजवळ आगमन झाले. संत एकनाथांच्या पादुकांना भीमा नदीमध्ये विधिवत पूजा करून भीमा स्नान घालण्यात आले. त्यानंतर चंद्रभागेच्या किनारी आरती होऊन पालखीने प्रस्थान केले.