विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत पैठण तालुक्यात भारतीय जनता पक्षाला प्रशासकीय पातळीवर मोठा झटका बसला आहे. एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्याच्या आक्षेपामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांचे अधिकृतत्व धोक्यात आले. परिणामी, आता तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांमध्ये भाजपचे उमेदवार 'अपक्ष' म्हणून रिंगणात असतील, अशी माहिती भाजपचे नेते दत्तात्रय गोर्डे यांनी दिली. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरातील संत पीठाच्या आवारात प्रचंड गर्दी होती. यावेळी भाजपचे एबी फॉर्म सादर करताना वेळेची मर्यादा ओलांडली गेल्याचा दावा शिंदेसेनेचे शिवराज भुमरे यांनी केला. भाजपचे 4 एबी फॉर्म उशिरा आल्याचा ठाम आक्षेप घेत भुमरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठिय्या आंदोलन केले. हा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरल्याने भाजप उमेदवारांचे गट व 18 गणांमध्ये भाजपचे उमेदवार अपक्ष म्हणून लढतील अधिकृत पक्षीय नामांकन नाकारण्यात आले.
हेही वाचा : Solapur ZP Election: करमाळ्यात निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले; शिवसेना जिल्हाप्रमुख आणि निवडणूक अधिकारी भिडले; व्हिडिओ आला समोर