Wednesday, April 22, 2026 11:48:10 PM

Nagpur Gas Cylinder Scam : नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार! मेसेज तुमच्या नावावर, सिलेंडर मात्र दुसराच व्यक्ती घेऊन गेला

नागपुरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

nagpur gas cylinder scam  नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार मेसेज तुमच्या नावावर सिलेंडर मात्र दुसराच व्यक्ती घेऊन गेला

नागपुरात सध्या एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली असून, याबाबत प्रशासनाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. नागपुरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. नागपुरातील रेशीमबाग परिसरातील भारत एजन्सीकडून नागरिकांना मोबाईलवरून ऑनलाईन बुकिंग करण्यास सांगितले जात असले, तरी ऑनलाईन बुकिंग सेवा बंद असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा- Middle East Conflict: महागाईमुळे पेटवलेली चूलही विझणार! युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसनंतर लाकूडही परवडेनासे; दर ऐकून चिंता वाढेल

तसेच काही ठिकाणी नंबर लागल्यानंतर आणि मोबाईलवर अधिकृत मेसेज आल्यानंतरही दुसराच व्यक्ती सिलेंडर घेऊन जात असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून या परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमिवर गॅसची अवैध साठवणूक करून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. गरजेनुसार व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- Middle East War Impact On Farmers : आखाती युद्धामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! कृषी साहित्य महागले, शेतमालाच्या दरात मात्र मोठी घट

नाशिकमध्ये आजच्या तारखेपर्यंत गॅसचा कोणताही तुटवडा जाणवत नसून, नागरिकांनी घाबरून जाऊन कोणीही गॅस खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या नागपुरात एकही हॉटेल बंद नसल्याची माहितीही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. शाळा, आरोग्य विभाग आणि इतर अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा व्यावसायिक हेतूने वापर केला जात असेल तर तक्रारीसाठी नागरिकांनी पुढे यावे आम्ही कारवाई करू असे आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.
 


सम्बन्धित सामग्री