Bomb threat at Mumbai International Airport and Taj Mahal Palace Hotel
Edited Image
मुंबई: मुंबई विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ही धमकी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. या ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की, ताजमहाल पॅलेस हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब हल्ला केला जाईल.
या मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि शैवक्कू शंकर यांना अन्याय्य फाशी देण्याचा उल्लेख करून धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मेल पाठवणाऱ्या आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - रक्षकच बनला भक्षक; पोलिसाने शिक्षिकेवर केला अत्याचार, धक्कादायक प्रकार उघड
विमानतळ आणि हॉटेल परिसर स्कॅन करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत, परंतु आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळलेली नाही. अधिकारी सध्या ईमेलचे मूळ शोधण्यासाठी आणि धमकीमागील व्यक्ती ओळखण्यासाठी काम करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली असून मुंबईतील प्रमुख पायाभूत सुविधांच्या ठिकाणी आणि आसपास दक्षता वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा - 'जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या व्यक्तींचे नाव स्टँडला देण्याचा अभिमान'
महाराष्ट्र सचिवालयात बॉम्बस्फोटाची धमकी -
यापूर्वी अनेकदा मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटोच्या धमक्या मिळाल्या आहे. 13 मे रोजी, दक्षिण मुंबईतील महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात बॉम्बस्फोटाचा इशारा देणारा ईमेल प्राप्त झाला होता. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या अधिकाऱ्याला मिळालेल्या निनावी ईमेलमध्ये 48 तासांच्या आत स्फोट होईल असे म्हटले होते. परंतु कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख नव्हता. पोलिसांनी विस्तीर्ण संकुलाची झडती घेतली होती. परंतु, पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नव्हते.