छत्रपती संभाजीनगर : ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रगतीसाठी ब्राह्मण महाअधिवेशनाचे आयोजन रविवार, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत मंथन हॉल, बीड बायपास, एमआयटी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. अधिवेशनाची सुरुवात ध्वजपूजन व दीपप्रज्वलनाने होणार असून यावेळी BBIN ब्राह्मण उद्योजक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे उद्घाटनपर मार्गदर्शन करणार असून अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी असतील. विशेष सत्कारमूर्ती म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा पहिला नागरी सत्कार करण्यात येणार असून त्या महिला आयोगाचे कायदे व संरक्षण यावर मार्गदर्शन करतील. यासोबतच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीर दास महाराज (काळाराम मंदिर, नाशिक), प. पु. श्री विजय शास्री महाराज अहमदाबाद, ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे, उद्योजक शिरीष बोराळकर, परभणी अधिवेशनाध्यक्ष बंडू नाना सराफ, तसेच समाजनेते निखिल लातूरकर (नांदेड) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दुपारच्या स्नेहभोजनानंतर ब्राह्मण समाजातील नव-निर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा समाजातर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात अधिवेशनाध्यक्ष रमेश देहेडकर (जालना) यांच्या अध्यक्ष ते खाली संघटन ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अनिकेत सराफ, कला, राम कुलकर्णी (शिक्षण), श्रुती कुलकर्णी (आयटी), डॉ. विजय महाजन, आयुर्वेद, रोजगार व जमीन विषयक मार्गदर्शन होणार आहे. यावेळी ॲड. भानुदास शौचे, बंडू नाना सराफ यांना जीवन गौरव श्री पप्पू कुलकर्णी जमीन संरक्षण, राजू वैद्य युवकांनी राजकारणात यावे, राजू काजे प्रसिद्ध गायक, श्रीराम कुलकर्णी आदी मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.
समारोप सत्रात आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीर दास महाराज यांचे मार्गदर्शन होणार असून दुपारी 4 ते 6 या वेळेत विविध जिल्ह्यांतील ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्ते, संस्था व उद्योजकांचा सन्मान तसेच समाजाचे ठराव मंजूर केले जाणार आहेत. या अधिवेशनात मोफत वधू-वर नोंदणी, ब्राह्मण उद्योजकांची मोफत नोंदणी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पदवीधर मतदार नोंदणी तसेच रोजगार इच्छुकांची नोंदणी केली जाणार आहे. या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला विजय काजे, संतोष जोशी, लक्ष्मीकांत दडके, नाना कुलकर्णी, चेतन जोशी आदी उपस्थित होते, अशी माहिती स्वागताध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दिली.