Monday, May 11, 2026 12:49:50 PM

Shiv Sena UBT Candidate: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरेंची माघार

महाराष्ट्र राजकारणात सुरू असलेल्या 'उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का?' या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

shiv sena ubt candidate मोठी बातमी विधानपरिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरेंची माघार

Shiv Sena UBT Candidate: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राजकारणात सुरू असलेल्या 'उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का?' या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. ठाकरे गटाने राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का देत अंबादास दानवे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. स्वतः उद्धव ठाकरेंऐवजी दानवेंना संधी देऊन पक्षाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, निष्ठावान नेत्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

संजय राऊत यांची 'एक्स' पोस्ट आणि उमेदवारीची मोठी घोषणा
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली. त्यांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार असतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंनीच ही उमेदवारी स्वीकारावी, असा आग्रह धरला होता. मात्र, ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून आपल्या विश्वासू सहकाऱ्याला बळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

अंबादास दानवे गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आता अर्ज भरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अंबादास दानवे गुरुवारी सकाळी 11:11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच संपला होता, त्यांना पुन्हा संधी देऊन पक्षाने मराठवाड्यातील एका आक्रमक चेहऱ्याला न्याय दिला आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यात दानवे यांचा मोठा वाटा होता, तोच आक्रमकपणा कायम ठेवण्याचा पक्षाचा मानस आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी! शिष्यवृत्तीपासून रोजगारापर्यंत राज्य सरकारचे 7 निर्णय; कोणाला मिळणार थेट लाभ?

उद्धव ठाकरेंनी दानवेंची निवड का केली?  
या निर्णयामागे काही महत्त्वाची राजकीय कारणे असल्याचे बोलले जात आहे. स्वतः उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावर आणि पक्षसंघटनेवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. तसेच, विरोधी पक्षनेते म्हणून दानवे यांनी केलेली कामगिरी पाहता, सभागृहात अनुभवी नेत्याची गरज असल्याने त्यांना पुन्हा पसंती देण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री