Car parking lift प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
मुंबई: मुंबईतील बोरिवलीमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी बोरिवली पश्चिम येथील एका उंच इमारतीत कार पार्किंग लिफ्ट 7 मीटर खोल खड्ड्यात कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेत आणखी एक व्यक्ती गंभीर झाला. शुभम मदनलाल धुरी असे मृताचे नाव असून जखमी सुनजीत यादव यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना बीडीबीए शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा - निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी
प्राप्त माहिनुसार, बोरिवली पश्चिम येथील लिंक रोडवरील 21 मजली ओम प्रथमेश टॉवरमध्ये सकाळी 11.8 वाजता हा अपघात झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) नुसार, कोसळलेल्या पार्किंग लिफ्टखाली दोन जण अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. हा अपघात कसा झाला? याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत.
हेही वाचा - अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून पत्नीची पेस्टिसाइडचं इंजेक्शन देऊन निर्घृण हत्या; पतीसह पाच जणांना अटक
दरम्यान, मुंबईतील विक्रोळी भागातही अशीच एक घटना घडली होती. येथे गणेश मैदानात मित्रांसोबत असताना झाड कोसळून एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. विक्रोळीतील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.