Sunday, March 08, 2026 01:44:21 PM

Zilla Parishad Election 2026: EVM मशीनमध्ये बिघाड; छत्रपती संभाजीनगरमधील दोन केंद्रावर उडाला गोंधळ

प्रशासनाने पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान पुन्हा सुरू केले. इतर जिल्ह्यांमध्ये मतदान शांततेत सुरू आहे.

zilla parishad election 2026 evm मशीनमध्ये बिघाड छत्रपती संभाजीनगरमधील दोन केंद्रावर उडाला गोंधळ

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असताना छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज मतदान केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन ठिकाणी अशा प्रकारचा बिघाड झाल्याने काही काळ मतदान थांबवावे लागले. ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा आरोप काही मतदारांनी केला असून, यामुळे केंद्राबाहेर नाराजी व्यक्त करण्यात आली.

अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान सुरू होण्याच्या आदल्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी मशीनची नियमित तपासणी करण्यात आली होती. तथापि, अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे काही काळ मतदान खंडित झाले. मात्र, पर्यायी ईव्हीएम मशीन तातडीने उपलब्ध करून देण्यात आली आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर दहा दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीला बसणार फटका,कोणते मार्ग असतील बंद?

मतदारांचा संताप

ईव्हीएममध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याच्या घटनांमुळे काही मतदारांनी निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाबाबत प्रश्न उपस्थित केले. “अशा घटना वारंवार घडत असल्याने संभ्रम निर्माण होतो,” अशी प्रतिक्रिया काही मतदारांनी व्यक्त केली. जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घटनेची माहिती दिली आहे.

राज्यभर शांततेत मतदान

दरम्यान, इतर जिल्ह्यांमध्ये काही अपवाद वगळता मतदान शांततेत सुरू असून, सकाळपासून मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा आणि बंदोबस्ताची व्यवस्था केली असून, मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे.राज्यातील या महत्त्वाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मतदानानंतर मतमोजणीतून ग्रामीण सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: Indians In America: ट्रम्प यांचा भारतीयांना 'दे धक्का'; या' एका निर्णयाने अमेरिकेतून 3800 भारतीयांची हकालपट्ट


सम्बन्धित सामग्री