विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचे 23 सदस्य निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 21 सदस्य निवडून आले आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या मतदारसंघात भाजप आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी दोन- दोन जागा मिळाल्या. तर पालकमंत्र्यांना मात्र भोपळा फोडता आला नाही. त्यासोबतच पंचायत समितीच्या 9 पैकी 6 पंचायत समित्यांवर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तर 3 ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व आहे. यामध्ये सिल्लोड सोयगाव मतदारसंघात या अगोदर एक हाती सत्ता घेणाऱ्या अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला. सिल्लोड सोयगाव पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजी-माजी पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.
हेही वाचा : Sindhudurg ZP Election Results 2026: सत्ता महायुतीची, चर्चेत बंडखोर! सिंधुदुर्ग जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत अपक्षांचा अनपेक्षित प्रभाव; वाचा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल हाती आले असून या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाला आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 9 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे 5 तर अपक्ष 4 सदस्य निवडून आले आहेत. तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानेही एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून आपलं खातं उघडलं आहे. खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांनी आपला बालेकिल्ला सांभाळल्याचे पाहायला मिळाले. खासदार भुमरे यांनी पैठण मतदारसंघातील 9 पैकी 8 जागेवर वर्चस्व कायम ठेवले आहे. तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही सिल्लोडमध्ये 6 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले आहे. मात्र शिंदेसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघांमध्ये चारही जागेवर शिवसेनेला परभावाला सामोरे जावा लागला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 2017 साली जिल्हा परिषदेच्या 62 जागांसाठी मतदान पार पडले होते. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 22 जागांवर विजय मिळत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता. त्यापाठोपाठ शिवसेनेने (एकत्र असताना) 18 जागेवर विजय मिळवला होता. परंतु काही कारणास्तव काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केली होती.
2017 साली पक्षिय बलाबल -
भाजप - 22
शिवसेना - 18
काँग्रेस - 16
राष्ट्रवादी - 3
मनसे - 1
अपक्ष (भाजप पुरस्कृत) - 1
अपक्ष - 1
एकूण - 62
जिल्हा परिषद अंतिम निकाल 2026 -
63 / 63
भाजप - 23
शिवसेना - 21
शिवसेना (उबाठा) - 9
राष्ट्रवादी काँग्रेस - 4
राष्ट्रवादी (शप गट) - 1
काँग्रेस - 1
वंचित - 0
एमआयएम - 0
अपक्ष - 4 (2 भाजप समर्थक, 1 शिंदे समर्थक, 1 प्रहार)