मुंबई : समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावरुन प्रवासही केला.
हेही वाचा : ठाकरे गटाचा 9 जूनला मेळावा होणार; आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार
आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण
समृद्धी महामार्गाचा इगतपुरी-आमणे हा 76 किमीचा शेवटचा टप्पा आहे. 35 मीटर रूंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग आहे. आता मुंबईकरांना फक्त 8 तासांत नागपूर गाठता येणार आहे. तर नाशिक येथून मुंबई फक्त अडीच तासांत गाठणं शक्य होणार आहे. समृद्धी महामार्ग हा 6 लेनचा,120 मीटर रुंदीचा आणि 701 किलोमीटर लांबीची महामार्ग आहे. ताशी 150 किमी गतीने प्रवासासाठी महामार्गाचं डिझाईन करण्यात आलं आहे. महामार्गावर 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज आहेत. तर कसारा घाटातून जाताना 6 बोगदे आहेत. अनेक वाहनं तसेच पादचारी अंडरपास आहे. इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ 8 किमी लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आलाय. अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फूल वॉटर मिस्ट सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे.