मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात सर्वच क्षेत्रात क्रांती केली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली आहे. परिवर्तनशील दशकातून नव्या दशकाकडे नवी सुरुवात झाली आहे. मोदी सरकारचे काम पारदर्शकता, निर्णयक्षम कामकाज केले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
भ्रष्टाचार, तुष्टीकरण कारभारात नव्हते. 11 वर्षात महाराष्ट्रात पावणे दोन लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. पूर्वीच्या युपीए काळात दहा वर्षात दिलेली रक्कम मोदी सरकारने एका वर्षात दिली. मोदी सरकारच्या साहाय्याने 6 लाख कोटींचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प सुरू आहेत. तसेच एका वर्षात राज्याला 30 लाख घरे देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. घरापासून वंचित असलेल्यांनाही घरे देण्यासाठी आदेशही त्यांनी दिले आहेत, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. 81 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातंय हे सगळं मोदी सरकारमुळे होत आहे.
हेही वाचा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी
मोदी सरकारची 11 वर्षे 11 निर्णय
काश्मीरमधील कलम 370 हटवलं
26 कोटी नागरिक दारिद्र रेषेच्यावर आले
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण
1.25 कोटी महिला 'लखपती दीदी'
मराठीसहित 11 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
गरिबांना 1 लाख घरं देण्याचा विक्रम
देशाचं बजेट शेतकऱ्यांना 1 लाख 37 हजार कोटी रुपये
चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
आत्मनिर्भर भारत बनवण्यात यश
स्वच्छ भारत अभियानामुळे एक स्वच्छता चळवळ उभारली गेली
ऑपरेशन सिंदूर राबवत पाकला धडा शिकवला