Saturday, February 14, 2026 03:32:15 AM

Dhule Crime : धुळ्यात मतदानापूर्वी राडा, शिवसेना उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला; भाजपवर गंभीर आरोप

प्रभाग क्रमांक 2 मधील शिंदे सेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या निवासस्थानावर भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि तोडफोड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

dhule crime  धुळ्यात मतदानापूर्वी राडा शिवसेना उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला भाजपवर गंभीर आरोप

Dhule Crime : महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरले असतानाच धुळे शहरात राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील शिंदे सेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या निवासस्थानावर भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि तोडफोड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दुसरीकडे, एकाच कार्यकर्त्याकडे 500 हून अधिक मतदान कार्डं आढळल्याने निवडणूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा - Ashish Shelar: 'आधी तुमचे राजकीय सल्लागार बदला...'; आशिष शेलारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला

शिंदे सेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर दगडफेक 

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर दगडफेक करत खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, भाजप उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी दहशत पसरवण्यासाठी हा हल्ला केल्याचा थेट आरोप केला आहे. 

हेही वाचा - Devendra Fadnavis : 'मशिदींवर लाऊडस्पीकर लावणे, हाच उबाठाचा...', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी मोरे यांनी केली आहे. उद्या धुळे महानगरपालिकेसाठी मतदान होत असून, या हिंसक घटनेमुळे मतदानाच्या दिवशी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या