Tuesday, November 11, 2025 10:49:10 PM

CM Devendra Fadnavis : फडणवीस सरकारची मोठी घोषणा! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर

एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 लाख 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे, राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

cm devendra fadnavis  फडणवीस सरकारची मोठी घोषणा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई: मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. 23 सप्टेंबर रोजी, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पूरबाधीत शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय जारी करण्यात आले. तसेच, 24 सप्टेंबर रोजी, पुरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते. 

अशातच, 'मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत दिली जाईल', असे आश्वासनही राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 लाख 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे, राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'राज्यातील विविध राज्यात शेतकऱ्यांसह अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, ज्या घरांची पडझड झाली आणि ज्या गोठ्यांचे नुकसान झाले, त्यांना देखील आपण मदत करणार आहोत. या पूरपरिस्थितीत अनेक दुकानदारांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त दुकानदारांना राज्य सरकार 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत करतील. गाय, म्हैस, शेळी यांसारख्या दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37 हजार 500 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह, एनडीआरएफमध्ये तीन जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे, ती पूर्णपणे काढण्यात आली आहे. ज्या पूरग्रस्त गावात जनावरांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्यासाठी राज्य सरकारतर्फे नुकसानभरपाई देण्यात येईल'.

पुढे, फडणवीस म्हणाले की, 'शेतीची नांगरणी करण्यासाठी, धान्य किंवा इतर खाद्यपदार्थ करण्यासाठी जी ओढकाम जनावरे आहेत, त्यांच्यासाठी प्रति जनावर 32 हजार रुपये देण्यात येईल. यासह, खरडून गेलेली जी जमीन आहे, तिथे 47 हजार हेक्टरी रोख रक्कम आणि 3 लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत. म्हणजेच, खरडून गेलेल्या जमिनींसाठी जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्यात येईल. मुख्य बाब म्हणजे, ज्या पूरग्रस्त विहिरिंत गाळ गेली आहे, ज्या विहिरींचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी प्रति विहिर 30 हजार रुपये दिले जाईल. ग्रमाणी भागात पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे, तिथे 10 हजार कोटी रुपयांची मदत केली जाईल'. 

हेही वाचा: Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी अक्षय कुमारला दिली पोलिसांच्या 'बूट डिझाईन'ची जबाबदारी; अॅक्शन हिरोने याकडे वेधलं लक्ष

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी

या पत्रकार परिषददरम्यान, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षाशुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा होतो की, यावर्षी परीक्षा देण्यासाठी पूरबाधित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्याची गरज पडणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची मुले शिक्षणासाठी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर  जिल्ह्यात जातात. यादरम्यान, मुलांच्या राहण्याचा, जेवणाचा खर्चही खूप असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे, राज्य सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षाशुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान, अनेक महत्त्वाचे निर्णय याठिकाणी घेण्यात आले. राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


सम्बन्धित सामग्री