Thursday, May 22, 2025 06:19:55 PM

राज-उद्धव युतीवर उद्धव ठाकरेंना घातल्या अटी; अटी मान्य असतील तर युती होणार?

किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार असं ठाकरेंनी म्हटलंय, मात्र त्यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत.

राज-उद्धव युतीवर उद्धव ठाकरेंना घातल्या अटी अटी मान्य असतील तर युती होणार

मुंबई : आमच्यातले वाद, भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरेंना राज यांनी प्रस्ताव दिला आहे. मी सोबत काम करावं ही उद्धव ठाकरेंची इच्छा आहे का? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिलं आहे. किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार असं ठाकरेंनी म्हटलंय, मात्र त्यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत. 

'दादू'च्या अटी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर चर्चांणा उधाण आले आहे. अशातच राज यांना एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. गुजरातला कारभार नेणाऱ्यांची साथ नकोच. आधी पाठिंबा,मग विरोध अशी भूमिका कदापी नको. महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्याचं स्वागत करू नये. राज्याच्या हिताआड येणाऱ्यांसोबत पंगतीही नकोत. असे उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या घरीही जाऊ नये. एसंशिं पण सोबत नको. कोणासोबत गेल्यावर महाराष्ट्राचं हित? ते आधी ठरवा असे राज यांना उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. पुढे बोलताना, मगच पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा ते ठरवा. कळत नकळत गाठीभेठीही घ्यायच्या नाहीत, ना प्रचार करायचा. पहिली शपथ घ्यायची शिवाजी महाराजांची मग टाळी देण्याची हाळी द्यायची अशा अटी उद्धव ठाकरे यांनी घातल्या आहेत. 

हेही वाचा : आम्ही युतीमध्ये येणार नाही; राज-उद्धव युतीवर संदीप देशपांडेंचे भाष्य

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एकत्र येणं, सोबत राहणं कठीण नाही असे ठाकरे गट-मनसेच्या युतीवर राज ठाकरेंचं विधान केले आहे. विषय एकत्र येण्याचा नाही, इच्छेचा आहे. आमच्यातली भांडणं छोटी, महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे. माझी तयारी पण त्यांची आहे का? असे वक्तव्य राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत केले आहे. राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं नव्हती मिटवून टाकतो. माझ्यासोबत येऊन की भाजपासोबत जाऊन हित, हे पाहा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी यांनी युतीच्या वक्तव्यावर दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री