Wednesday, May 14, 2025 11:17:12 PM

पुण्यात चौथ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शहरातील काळेपडळ परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला.

पुण्यात चौथ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू कंत्राटदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Construction worker dies In Pune (प्रतिकात्मक प्रतिमा)
Edited Image, प्रतिकात्मक प्रतिमा

पुणे: पुणे शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील काळेपडळ परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काळेपडळ पोलिसांनी कंत्राटदारासह तिघांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मृताचे नाव राजू सोपान अवचार (वय,43) असे आहे. मृत कामगार आदर्श नगर, उरुळी देवाची, हडपसर-सासवड रोड येथील रहिवासी होता. 

कामगाराच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा कृष्णा अवचार (वय, 28) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात कंत्राटदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अवचार काळेपडळ येथील जेएसपीएम कॉलेजच्या मागे असलेल्या एका गृहनिर्माण प्रकल्पात बांधकाम कामगार म्हणून काम करत होते. ही घटना रविवारी, 13 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता घडली. 

हेही वाचा - ईश्वरी उर्फ तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; ससूनचे डीन करणार अहवाल सादर

दरम्यान, चौथ्या मजल्यावर काम करत असताना राजू अवचार यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चौकशीत असे आढळून आले की कंत्राटदाराने हेल्मेट आणि हार्नेससारखे आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवले नव्हते आणि घटनास्थळी पुरेसे सुरक्षा उपाय नव्हते. 

हेही वाचा - पुण्यातील 55 वर्षीय उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या

याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील विकास बनकर (30, रा. भोसलेनगर, हडपसर), रघुनाथ बबन खोपकर (रा. फातिमानगर, वानवडी) आणि संतोष बाबुराव राठोड (30, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


सम्बन्धित सामग्री