पुणे : वैष्णवीचे बाळ देण्यास नकार देणाऱ्या निलेश चव्हाणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाणांचा शोध सुरु आहे. निलेश चव्हाण करिष्मा हगवणेचा मित्र आहे. त्यातच आता निलेशचे कारनामे समोर आले आहे. स्पाय कॅमेऱ्यानं स्वत:च्याच पत्नीचं आक्षेपार्ह चित्रीकरण तो करत होता. शरीर संबंधाचे व्हिडीओही त्याने काढले तसेच इतर मुलींसह शरीरसंबंधाचेही व्हिडीओ त्याने काढले आहेत.
'विकृत' निलेश चव्हाणचे कारनामे
निलेश चव्हाण स्पाय कॅमेऱ्यानं स्वत:च्याच पत्नीचं आक्षेपार्ह चित्रीकरण करत होता. 2019 साली वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. बेडरूमच्या सिलिंग फॅनला स्पाय कॅमेरा लावायचा. एवढंच नाही तर एसीलाही स्पाय कॅमेरा जोडलेला होता. शरीर संबंधाचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करायचा. निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले. इतर मुलींसह शरीरसंबंधाचेही व्हिडीओही रेकॉर्ड करायचा. पत्नीनं जाब विचारताच निलेशनं चाकू दाखवत धमकावलं,गळाही दाबला. निलेशच्या पत्नीनं सासू-सासऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर उलट तिचाच सासू-सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. निलेशसह त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला. तरीही वारजे पोलिसांकडून निलेशला अभय देण्यात आले. अखेर मुंबई हायकोर्टाकडून निलेशला अटकपूर्व जामीन मिळाला. निलेश हा शंशाकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे. निलेशचा बांधकाम,पोकलेन मशीनचा व्यवसाय आहे.
हेही वाचा : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिता - पुत्राला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे बाळ वैष्णवीच्या माहेरच्यांना देण्यास हगवणे कुटुबियांनी विरोध केला. त्यानंतर ते बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचे कस्पटे कुटुंबियांना कळाले. त्यानंतर त्यांनी निलेश चव्हाण याच्या घरी जाऊन बाळ देण्याची मागणी केली. त्यावर निलेशने त्यांना बंदुकीचा धाक दाखवत हकलून लावले. त्यानंतर गुरुवारी अजित पवारांनी रुपाली ठोंबरे आणि वैशाली नागवडे यांच्यावर कस्पटे कुटुंबियांकडे बाळ सोपावण्याची जबाबदारी दिली. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीकडून वैष्णवीचं बाळ कस्पटे कुटुंबियाकडे आले. त्यानंतर आता निलेश चव्हाण याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.