पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्येवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. हगवणेंचे पवार कुटुंबियासोबत जवळचे संबंध असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.
वैष्णवी हगवणे या 23 वर्षीय तरुणीच्या हुंडाबळीची घटना सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. हुंड्यासाठी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचा खूप छळ केला. त्यामुळे तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात सासरे, सासू, नवरा, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाला वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात तिच्या सासरच्यांनी नकार दिला. त्यानंतर कस्पटे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. यानंतर या प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक मंडळींनी भाष्य करण्यात सुरुवात केली. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका होताना पाहायला मिळाली.
हेही वाचा : नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याचाही मार्ग मोकळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
दमानियांची अजित पवारांवर जोरदार टीका
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. हगवणेंचे पवार कुटुंबीयांसोबत जवळचे संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वैष्णवीला अनेकदा मारहाण झाली हे वडिलांना माहिती होतं. नणंद करिष्मा वैष्णवीला मारहाण करत माहेरी घेऊन गेली होती. तेव्हा वैष्णवीच्या आई-वडिलांनी करिष्माच्या पाया पडल्या. मुलगी ही देवाणघेवाणाची वस्तू नाही असं म्हणत त्यांनी प्रकरणावर राग व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दमानियांनी टीका केली आहे. आधी अजित पवार म्हणाले हगवणे आमचा पदाधिकारी नाही. अजित पवारांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला दमानियांनी अजित पवार यांना दिला आहे.