Wednesday, June 18, 2025 03:37:13 PM

'ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना 10 हजार मदत करा'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामती येथील नुकसानग्रस्त गावातील अनेक भागांची पाहणी केली. यावेळी, त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांसोबतही संवाद साधला.

ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना 10 हजार मदत करा उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

नवनाथ बोरकर. प्रतिनिधी. बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बारामती येथील नुकसानग्रस्त गावातील अनेक भागांची पाहणी केली. यावेळी, त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांसोबतही संवाद साधला. या पाहणी दरम्यान त्यांनी नुकसानग्रस्त आणि ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्यासाठी घोषणा केली आहे. 

काय म्हणाले अजित पवार?

भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली की, 'नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धान्य देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्या लोकांना दहा हजार रुपये तातडीची मदत देणार आहोत आणि ही दहा हजार रुपये मदत आजपासून सोडण्यासाठी सांगणार आहे', असे देखील अजित पवारांनी नुकसानग्रस्त लोकांना आश्वासन देत म्हणाले होते. 'वेळ लागेल, पण सर्वांना मदत मिळेल', असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती येथील सिद्धेश्वर निंबोडी परिसराची पाहणी करताना नुकसानग्रस्त नागरिकांना सांगितले.


सम्बन्धित सामग्री