Thursday, November 13, 2025 08:18:41 AM

DCM Ajit Pawar : अजितदादा सकाळी सकाळीच पुण्यात धडकले, रस्ते, पूल, मेट्रोची पाहणी; प्रशासनाला कडक सूचना

आज सकाळी सात वाजल्यापासून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुण्यातील विकासकामांची पाहणी सुरू केली.

dcm ajit pawar  अजितदादा सकाळी सकाळीच पुण्यात धडकले रस्ते पूल मेट्रोची पाहणी प्रशासनाला कडक सूचना

पुणे: आज सकाळी सात वाजल्यापासून उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुण्यातील विकासकामांची पाहणी सुरू केली. यादरम्यान, अजित पवारांनी पुण्यात नव्याने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या तानपुरा पुलाची पाहणी केली. सोबतच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपळे सौदागर परिसरातील समृद्धी पार्क सोसायटीजवळ असलेल्या आर्मी रोडची आज पाहणी केली. येथील काही रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने अर्धवट रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

'छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रोची जबाबदारी असली तरी, अतिरिक्त कारभार पीसीएमसीकडे (PCMC) देण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे मी आज पिंपरी चिंचवडला जाणार होतो, पण आरडीकरांनी मला सांगितले की, मी तानपुरा पुलाची पाहणी करण्यासाठी सकाळी 7 वाजता यावे. जर कोणता अधिकारी चांगला काम करत असेल, तर त्याच्या कामाचे कौतुक केले पाहिजे. तानपुरा पुलाची पाहणी करताना अनेक नागरिक भेटले. यादरम्यान, नागरिकांनी तानपुरा पुलाचे कौतुकही केले. रंतु, नदीचा भाग आणखी चांगला करण्यात यावा', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. 

हेही वाचा: Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; बांबू उद्योग धोरण जाहीर, रोजगार आणि शैक्षणिक विकासासाठी 500 कोटींची तरतूद

पुढे, अजित पवार म्हणाले की, 'यादरम्यान, नागरिकांनी भटक्या कुत्रांच्या होणाऱ्या त्रासांबद्दल तक्रारी केल्या. मात्र, मंत्रालयात बसून या गोष्टी कधी समजत नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून लोकांचा समस्या समजून घ्याव्या लागतात. यावेळी नागरिकांनी कामाचे कौतुकही केले आणि काही महत्त्वाच्या सुचनाही दिल्या. मला बारीक निरिक्षण करण्याची सवय आहे. त्यामुळे, मला जे काही जाणवलं, ते मी हर्डीकर आणि त्यांच्या टीमच्या लक्षात आणून दिलं. सध्या दुसऱ्या पुलाचे काम सुरू आहे, डिसेंबरपर्यंत दुसऱ्या पुलाचे काम पूर्ण होईल'.


सम्बन्धित सामग्री