Tuesday, March 10, 2026 02:21:50 AM

DCM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची बातमी; लवकरच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यादरम्यान, राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंंड नुकसान झाले.

dcm eknath shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची बातमी लवकरच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

पुणे: राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यादरम्यान, राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंंड नुकसान झाले. अशातच, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पूरबाधीत शेतकऱ्यांसाठी 23 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आले. 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली. तसेच, 24 सप्टेंबर रोजी पुरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते. अशातच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दिली आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

'मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. मराठवाड्यात खूप जास्त नुकसान झाले आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंडळी पुरग्रस्त गावांची पाहणी केली. नुकसान आणि संकट खूप मोठा आहे. अशा परिस्थितीत बळीराज्याच्या मागे उभा राहण्याचं काम सरकार करेल. आता बळीराज्याच्या आणि मायभगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते अश्रू पुसण्याचं काम करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे, याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊ. यावेळेस अटीशर्ती ज्या आहेत, त्या शिथिल कराव्या लागतील, काही बाजूला ठेवाव्या लागतील. परंतु, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम याठिकाणी सरकार नक्की करेल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. 

हेही वाचा: Shivsena UBT Dasara Melava: शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार?, समोर आली मोठी माहिती

पुढे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील होते. तेव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवेदन दिले की संकट मोठा आहे. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा मोठं संकट आलं, तेव्हा तेव्हा केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला. म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे आम्ही मदतीसाठी मागणी केली आहे, त्यांना पत्र दिले. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी बळीराज्याच्या नुकसानीसाठी पंतप्रधान मोदींकडे मदतीची मागणी केली. मला असं वाटतं की राज्य सरकारची तर जबाबदारी आहेच. राज्य सरकार कोणत्याही परिस्थिती हात आखडता घेणार नाही. परंतु केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदीदेखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत. यावेळी देखील ते शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील'.

यादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळायला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. तसेच, ज्या माध्यातून शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल, ते माध्यम याठिकाणी सरकार अवलंबेल'.


सम्बन्धित सामग्री