Saturday, June 14, 2025 04:23:54 AM

SAMBHAJINAGAR: अवकाळी पाऊस होऊनही संभाजीनगरात पाण्याचा प्रश्न कायम

गेल्या महिन्याच्या 6 तारखेपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तसेच, जून महिन्यात मॉन्सूनला सुरवात झाली आहे. मात्र, तरीही, काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई अजूनही कायम आहे.

sambhajinagar अवकाळी पाऊस होऊनही संभाजीनगरात पाण्याचा प्रश्न कायम

विजय चिडे. प्रतिनिधी. संभाजीनगर: गेल्या महिन्याच्या 6 तारखेपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तसेच, जून महिन्यात मॉन्सूनला सुरवात झाली आहे. मात्र, तरीही, काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई अजूनही कायम आहे.

मराठवाडा विभागात 362 गावे आणि 153 वाड्यांना 565 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक म्हणजे 273, तर त्यापाठोपाठ जालन्यात 183 टँकरद्वारे तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 184 गावांत आणि 32 वाड्यांमध्ये 273 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पाठोपाठ जालना जिल्ह्यातही पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची फरफट सुरू आहे. जालन्यातील 118 गावे आणि 25 वाड्यांना 193 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासह विभागातील अन्य जिल्ह्यांत देखील कमी-जास्त प्रमाणात पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे. विभागातील एकूण 362 गावांसह 153 वाड्यांमध्ये पाण्याची टंचाई दिसत आहे. या तहानलेल्या गावांना 568 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात शासकीय टँकरची संख्या केवळ 14 असून उर्वरित 551 टँकर खासगी आहेत.


सम्बन्धित सामग्री