Cabinet Meeting: महाराष्ट्रात सध्या महायुती सरकार कार्यरत असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप हे तीन पक्ष सत्तेत आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटातील काही मंत्री निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज असल्याचे संकेत समोर येत आहेत. मागील काळातही शिंदे आणि भाजपातील नेत्यांमध्ये या मुद्द्यावर उघड चर्चाही झाली होती.
हेही वाचा - Zilla Parishad Election: अखेर 'या' तारखेला होणार जिल्हापरिषद निवडणुका; लवकरच होणार अधिकृत घोषणा
मंत्र्यांचा बहिष्कार आणि आजची मंत्रिमंडळ बैठक
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे गटाचे सर्व मंत्री अनुपस्थित होते. या बैठकीत फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे मंत्र्यांनी निधीवाटपासंबंधी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतली आहे, परंतु या चर्चेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. शिंदे गटातील मंत्र्यांचा बहिष्कार आणि अनुपस्थितीमुळे राज्यातील राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड अधिक महत्त्वाची ठरली आहे, कारण या निवडणुकांमध्ये शिवसेना गटाला मोठा फटका बसत असल्याचे समजते.
हेही वाचा - Pimpri Chinchwad Politics: पिंपरी - चिंचवड महानगरपालिका राजकारण नव्या वळणावर; या प्रभागांच्या आरक्षणात बदल
दरम्यान, कल्याण-डोंबीवली क्षेत्रातील माजी नगरसेवकांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला आहे. अशा प्रकारच्या इन्कमिंगमुळे शिवसेनेत नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांचा बहिष्कार हा या नाराजीचा स्पष्ट संकेत मानला जात आहे. राज्यभरात भाजपात वाढत असलेल्या प्रवेशांमुळे आणि निधीवाटपावरून शिंदे गटातील अस्वस्थतेमुळे आगामी काळात महायुती सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकारणतज्ञ आणि स्थानिक नेते आता या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.