Maharashtra Municipal Elections 2026 : मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा अराज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली असून, या सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. खेर कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये राज्यभरातील सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे गेली 5 ते 7 वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर, सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी 31 डिसेंबरला, तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 2 जानेवारी असेल. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल.
मतदार यादी आणि निवडणूक व्यवस्थापन
राज्यातील 27 महापालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून, जालना आणि इचलकरंजी या 2 नव्याने स्थापन झालेल्या महापालिकांमध्येही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने, त्यामधील नावे वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यभरात एकूण 39,147 मतदान केंद्रे असतील. त्यापैकी केवळ मुंबईत 10,111 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी 11,349 कंट्रोल युनिट्स आणि सुमारे 22,000 बॅलेट युनिट्स वापरण्यात येणार आहेत.
हेही वाचा - Jayant Patil : गोपीचंद पडळकरांमुळे देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात अबोला?, भेट घेणं टाळलं?; व्यासपीठावरील चित्र बोलकं
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा निश्चित
निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चावरही मर्यादा ठरवली आहे.
अ वर्ग (मुंबईसह): 15 लाख रुपये
ब वर्ग: 13 लाख रुपये
क वर्ग: 11 लाख रुपये
ड वर्ग: 9 लाख रुपये
हेही वाचा - BMC Election 2006 : प्रतिक्षा संपली! मुंबई महापालिका निवडणूक मतदान 15 जानेवारीला तर मतामोजणी 16 जानेवारीला जाहीर; राज्य निवडणूक आयोगाची माहिती
मतदान पद्धतीत फरक
मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत असल्याने मतदाराला केवळ 1 मत देता येणार आहे. उर्वरित 28 महापालिकांमध्ये 1 ते 5 सदस्यीय वॉर्ड रचना असल्यामुळे त्यानुसार मतदानाची प्रक्रिया राबवली जाईल.
उमेदवारी अर्ज आणि सुविधा
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्यांच्याकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नाही, अशा उमेदवारांना निवडणुकीनंतर 6 महिन्यांच्या आत ते सादर करावे लागणार आहे. मतदार जनजागृतीसाठी विशेष रील्स तयार करण्यात आल्या असून, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर यांसारख्या सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध असतील.
निवडणूक यंत्रणा सज्ज
या निवडणुकीसाठी राज्यभरात 1,96,000 हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. मतदानाच्या 48 तास आधी प्रचारावर आणि जाहिरातींवर पूर्ण बंदी राहील. या 29 महापालिकांमध्ये एकूण 2,869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये 1,442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय, 341 अनुसूचित जाती, 77 अनुसूचित जमाती यांचा समावेश आहे.
या महापालिका निवडणुकांसाठी मतदान
या निवडणुकीत मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, नांदेड-वाघाळा, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर या महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
मुंबईतील दुबार मतदारांवर लक्ष
मुंबईत सुमारे 11 लाख संभाव्य दुबार मतदार असल्याची माहिती समोर आली आहे, जे एकूण मतदारांच्या सुमारे 7 टक्के आहेत. अशा मतदारांच्या नावासमोर दुहेरी स्टार चिन्ह देण्यात येणार आहे. त्यांच्या घरी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले असून, मतदान कुठे करणार याबाबत प्रतिज्ञापत्र घेतले गेले आहे. ज्यांचा सर्वे झाला नाही, त्यांच्याकडून मतदान केंद्रावरच हमीपत्र घेतले जाणार आहे.