मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी काल म्हणजेच 15 जानेवारीला मतदान पार पडल्या. या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान झाले आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान पार पडले असून तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी सुरु झाली आहे. यादरम्यान राज्यभरात 15 हजार 931 उमेदवारांसह एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदारांची नोंद झाली असून, यावेळी राज्यातील एकूण 893 प्रभागांसाठी तब्बल 15,931 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरु झाली आहे. याचपार्श्वभूमिवर आज राज्यभरात बृहन्मुंबई महानगरपालिकांसह 29 महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसह पक्षानुसार भाजप आणि दोन्ही शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्राणप्रतिष्ठेची असणार आहे.
हेही वाचा- ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 'म्हैसूर' पॅटर्न? महानगरपालिकेत शाईवरून झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मात्र निकालापुर्वीच कल्याण-डोंबिवलीत महायुतीतून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण 52.11 टक्के मतदान पार पडलं आहे. यात शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यात विश्वनाथ राणे, रमेश सुकऱ्या म्हात्रे, वृषाली रणजीत जोशी आणि हर्षल मोरे यांचा समावेश आहे. महायुतीचे सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामगचं कारण असं की, निवडणून आलेल्या 22 उमेदवारांच्या विरोधात कोणताच विरोधीपक्षातील उमेदवार लढतीसाठी उभा राहिला नाही.
हेही वाचा- Pune Exit Poll Result 2026 : कोण होणार पुण्याचा कारभारी? अजित पवारांना धक्का, तर भाजपची सरशी; दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
2015 साली पार पडलेल्या कल्याण-डोंबिवलीमधील महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा 52 जागांवर तर भाजपचा 42 जागांवर विजय झाला होता. तसेच मनसेला 9, काँग्रेसला 4, एमआयएमला 4, राष्ट्रवादीला 2 आणि बहुजन समाज पक्षाला एका जागेवर विजय मिळवता आला होता. त्यामुळे आजच्या निकालात कोणाचा महापौर होणार? कोणाचे जास्त नगरसेवक निवडून येणार आणि कोणता पक्ष महानगरपालिका निवडणुकांवर आपला झेंडा रोवणार याचसोहत कोणता पक्ष आपला गुलाल उडणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा- BMC Exit Poll Result 2026 : मुंबईत सत्तापालट? तर ठाण्यात शिंदेंनी गड राखला; एक्झिट पोल्सचे आकडे समोर
कल्याण-डोंबिवलीचे विजयी उमेदवार
| अ.क्र. |
प्रभाग (वार्ड) / वर्ग |
उमेदवाराचे पूर्ण नाव |
आरक्षण / प्रवर्ग |
| 1 |
२६ ब |
रंजना मितेश पेणकर |
सर्वसाधारण महिला |
| 2 |
२६ क |
आसावरी केदार नवरे |
सर्वसाधारण महिला |
| 3 |
२७ अ |
मंदा सुभाष पाटील |
ओ.बी.सी. महिला |
| 4 |
२४ ब |
ज्योती पवन पाटील |
सर्वसाधारण महिला |
| 5 |
१८ अ |
रेखा राजन चौधरी |
ओ.बी.सी. महिला |
| 6 |
२६ अ |
मुकुंद (विशू) बाबाजी पेडणेकर |
ओ.बी.सी. |
| 7 |
२७ ड |
महेश बाबुराव पाटील |
सर्वसाधारण |
| 8 |
१९ क |
साई शिवाजी शेलार |
सर्वसाधारण |
| 9 |
२३ अ |
दिपेश पुंडलिक म्हात्रे |
ओ.बी.सी. |
| 10 |
२३ ड |
जयेश पुंडलिक म्हात्रे |
सर्वसाधारण |
| 11 |
२३ क |
हर्षदा हृदयनाथ भोईर |
सर्वसाधारण महिला |
| 12 |
१९ ब |
सुनिता बाबुराव पाटील |
सर्वसाधारण महिला |
| 13 |
१९ अ |
पूजा योगेश म्हात्रे |
ओ.बी.सी. महिला |
| 14 |
३० अ |
रविना अमर माळी |
ओ.बी.सी. महिला |
| 15 |
२६ ड |
मंदार श्रीकांत हळबे |
सर्वसाधारण |