Sunday, February 15, 2026 08:18:56 AM

Ajit Pawar Death : शेवटी घड्याळ हीच अजित पवारांची ठरली शेवटची ओळख, घड्याळ आणि गॉगलवरून अजितदादांना ओळखल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा

ajit pawar death  शेवटी घड्याळ हीच अजित पवारांची ठरली शेवटची ओळख घड्याळ आणि गॉगलवरून अजितदादांना ओळखल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं आज बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झालं. बारामती येथे सभेसाठी येत असताना अजित पवार यांचे विमान क्रॅश झाले असून विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. अपघात इतका भीषण होता की, विमान संपूर्णपणे जळून खाक झालं. यामध्ये अजित पवारांसह आणखी पाच प्रवासी होते. त्यांचही या अपघातात निधन झाल्यानं समजतं. अपघात होताच येथे बचावकार्य सुरू झाले. यावेळी अजित पवारांचे घड्याळ आणि गॉगल यावरून यांचा मृतदेह ओळखल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ हे त्यांची शेवटची ओळख ठरल्याचे यातून दिसून येत आहे. 

हेही वाचा : Supriya Sule: सुप्रिया सुळे यांचे ‘उद्ध्वस्त’ असे व्हॉट्सॲप स्टेटस; सुनेत्रा पवारांसह बारामतीकडे रवाना

बारामतीजवळील एका गावातील प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी त्या शेतात काम करत होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विमानाने प्रथम एक फेरी घेतली आणि त्यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान अचानक मोठा आवाज झाला आणि जोरदार स्फोट झाला. “स्फोटानंतर आम्हाला विमानाजवळ दोन मृतदेह बाजूला पडलेले स्पष्टपणे दिसले. त्यापैकी एका मृतदेहाचा चेहरा ओळखू येत नव्हता, तर एक मृतदेह पूर्णपणे फुगलेला दिसत होता,” असे त्यांनी सांगितले. ही दृश्ये अत्यंत धक्कादायक होती, असेही त्या म्हणाल्या.


सम्बन्धित सामग्री