Sunday, July 13, 2025 11:09:25 AM

मोठी बातमी! जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात; कार आणि पिकअपच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

या पिकअपमध्ये किर्लोस्कर कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलमध्ये साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते. या वेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पिक अप टेम्पोला जोरदार धडक दिली.

मोठी बातमी जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात कार आणि पिकअपच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू
Accident on Jejuri Morgaon road
Edited Image, X

पुणे: पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जेजुरी मोरगाव रोडवर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. स्विफ्ट कार आणि पिक अप टेम्पोमध्ये हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, जेजुरी मोरगाव रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर हा अपघात घडला. जेजुरीहून मोरगावला जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच 42 एएक्स 1060) ने श्रीराम ढाब्यासमोरील एका पिकअप ट्रकला (क्रमांक एमएच 12 एक्स एम 3694) धडक दिली. 

8 जण जागीच ठार -

या पिकअपमध्ये किर्लोस्कर कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलमध्ये साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते. या वेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पिक अप टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये टेम्पोमधून साहित्य उतरवणारे तसेच हॉटेलचे मालक आणि कारमधील प्रवासी असे 8 जण जागीच ठार झाले. 

हेही वाचा - 'या' कारणामुळे विठ्ठल पाटील यांनी मानले फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचे आभार

या भीषण अपघातात दोन मुले आणि एक महिला तसेच दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळे जेजूरी-मोरगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. तथापी, अपघातस्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. 

हेही वाचा -  इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर सरकारला आली जाग! 25 वर्षांपेक्षा जुने पूल आणि इमारतीबाबत दिले महत्त्वाचे आदेश

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू- 

दरम्यान, सोमवारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने 4  जणांचा मृत्यू झाला होता. तसेच या दुर्घटनेत अनेकजण जखमी जाले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व जुने पूल काढून टाकण्याचा किंवा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री