Monday, June 23, 2025 11:18:25 AM

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिता - पुत्राला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात फरार राजेंद्र आणि सुशील हगवणेला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. यानंतर आता पिता पुत्राला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिता - पुत्राला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात फरार राजेंद्र आणि सुशील हगवणेला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. यानंतर आता पिता पुत्राला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणात  सध्या वैष्णवीची सासू, सासरे, दीर, नणंद आणि नवरा अटकेत आहेत. 

वैष्णवीच्या लग्नात भलामोठा हुंडा देऊनही तिच्या माहेरच्या लोकांकडून पैशांची मागणी केली जायची तसेच वैष्णवीच्या नवऱ्याकडून जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण न झाल्याने वैष्णवी मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात आला. या प्रकरणातील नराधम वृत्तीच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी राज्याभरातून होत आहे. 

हेही वाचा : राजेंद्र आणि सुशील हगवणेला खाली बसलेलं पाहून सासूला फुटला बांध

सुशील हगवणे व राजेंद्र हगवणेंनी 17 तारखेपासून कसा केला प्रवास?
17 तारखेला आलिशान इंडीवर गाडीतून राजेंद्र हगवणे हॉस्पिटलला गेले. त्यानंतर थार या गाडीतून मुहूर्त लॉन्स येथे गेले. नंतर याच गाडीतून वडगाव मावळकडे प्रवास केला. पुढे पवना डॅमकडे रवाना झाले व तेथेच फार्म हाऊसवर मुक्काम केला. त्यानंतर थार गाडीतून आळंदी येथे गेले व एका लॉजवर मुक्काम केला. त्यानंतर 18 तारखेला पुढे याच  धार गाडीतून वडगाव मावळ येथे गेले. वडगाव मावळ येथे बंडू फाटक यांच्याकडे बलेनो गाडीने गेले. 19 तारखेला पुसेगावकडे हे दोघेही जण रवाना झाले. पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर हे दोघेही गेले. नंतर पसरणी मार्गे कोगनोळी येथे 19 व 20 तारखेला हॉटेल हेरिटेज येथे मुक्काम केला. त्यानंतर पुढे 21 व 22 तारखेला प्रीतम पाटील मित्राच्या शेतावर मुक्काम केला. पुढे 22 ला रात्री पुण्याकडे रवाना झाले व पुण्यातील मुहूर्त लॉन्स या ठिकाणाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 


सम्बन्धित सामग्री