Tuesday, March 17, 2026 03:30:01 PM

Ajit Pawar Plane Crash Update: अजितदादांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डर्सवर आगीचा परिणाम; परदेशातील तंत्रज्ञांच्या मदतीने उलगडणार विमानातील शेवटच्या क्षणांचं सत्य

या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानातला फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि Black Box ताब्यात घेण्यात आला असून, त्यातील डेटा रेकॉर्ड करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

ajit pawar plane crash update अजितदादांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डर्सवर आगीचा परिणाम परदेशातील तंत्रज्ञांच्या मदतीने उलगडणार विमानातील शेवटच्या क्षणांचं सत्य

Ajit Pawar Plane Crash Update: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता तपासाला वेग आला आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानातला  फ्लाइट डेटा रेकॉर्डर (Flight Data Recorder FDR) आणि Black Box ताब्यात घेण्यात आला असून, त्यातील डेटा रेकॉर्ड करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातापूर्वी विमानात नेमके काय संभाषण झालं होतं आणि तांत्रिक स्थिती काय होती, याचा उलगडा करण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

डेटा रिकव्हरीमध्ये तांत्रिक अडचणी
प्राप्त माहितीनुसार, घटनास्थळावरून ब्लॅक बॉक्स (Black Box) रिकव्हर करण्यात आला आहे. मात्र, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, विमानातल्या दोन्ही रेकॉर्डर्सवर भीषण अपघाताचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हा सर्व डेटा सुरक्षितपणे रेकॉर्ड झाला आहे का, हे पाहणे तपास यंत्रणांसाठी मोठी कसोटी ठरत आहे. सध्या डेटा रिकव्हरीचे काम सुरू असले तरी, आतापर्यंत कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही.

तपासासाठी अमेरिका किंवा लंडनची मदत घेणार?
विमानातील रेकॉर्डर्स जळालेल्या अवस्थेत असल्याने, त्यातील माहिती वाचण्यात (Data Reading) स्थानिक यंत्रणांना काही अंशी अपयश येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, यापूर्वीच्या मोठ्या विमान अपघातांचा संदर्भ घेता, हा Black Box अधिक प्रगत तपासासाठी अमेरिकेत पाठवण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेथील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा डिकोड केला जाऊ शकतो.

हेही वाचा - Narhari Zirwal : 'पक्षातून कोणी माझं मंत्रीपद काढून घेईल...'; कथित लाचप्रकरणी नरहरी झिरवळ यांचे वक्तव्य

विमानातील अखेरच्या संभाषणावर लक्ष
या भीषण अपघातापूर्वी वैमानिक आणि नियंत्रण कक्ष किंवा विमानातील प्रवाशांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, हे शोधणं हा तपासाचा मुख्य भाग आहे. जर फ्लाईट डेटा यशस्वीरित्या रिकव्हर झाला, तरच या अपघातामागचे गूढ उकलण्यास मदत होईल. सध्याच्या घडीला सर्व यंत्रणा या दोन गोष्टींमधून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु तांत्रिक अडथळ्यांमुळे अद्याप पूर्ण यश मिळालेले नाही.
 


सम्बन्धित सामग्री