Tuesday, February 17, 2026 07:56:37 PM

Raj & Uddhav Thackeray : 'मनसेने असं का केलं? त्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता' मनसेच्या 'त्या' निर्णयावर उद्धव ठाकरे नाराज; नेमकं प्रकरण काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थानिक पातळीवर मनसेने घेतलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांची बैठक घेतली.

raj  uddhav thackeray  मनसेने असं का केलं त्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता मनसेच्या त्या निर्णयावर उद्धव ठाकरे नाराज नेमकं प्रकरण काय

कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थानिक पातळीवर मनसेने घेतलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकी उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल, असं म्हणत कल्याण डोंबिवली मधील नगरसेवकांना धीर देत विश्वास व्यक्त केला. तुम्हाला कुठेही वाळीत टाकले जाणार नाही, तुम्ही भविष्याची चिंता करू नका असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या नगरसेवकांना दिला. तसेच या बैठकीत नगरसेवकांनी, आम्हाला दोन्ही पक्षाकडून संपर्क साधला जात आहे आणि प्रस्ताव समोर ठेवले जात आहेत, याबद्दल नेमकं काय करावं? याची विचारणा केली आणि उद्धव ठाकरेंचा मार्गदर्शन मागितलं.

हेही वाचा- BMC Mayor: ठाकरेंच्या मनातलं देवाभाऊंच्या ओठावर? डाव फसला; मुंबईच्या महापौर पदासाठीचं सगळंच चित्र पलटणार?

त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षात बसणार आहोत मात्र यामध्ये सुद्धा तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू असं आपल्या नगरसेवकांना म्हटलं. कुठलाही प्रस्ताव जरी आला तरी पक्ष पातळीवर पक्ष यासंदर्भात निर्णय घेईल, त्यामुळे सध्या तरी विरोधी बाकावर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बसणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांसमोर स्पष्ट केलं. मनसेच्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी असा निर्णय का घेतला? हा निर्णय घ्यायला नको होता. जर मनसे आणि आपल्या पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर एक ताकदीचा विरोधी गट कल्याण डोंबिवली महापालिकेत बसला असता, असे उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना बोलताना स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा- Mumbai University : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 ते 7 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं; जाणून घ्या परिक्षांच्या नवीन तारखा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत काय उलथापालत? 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेशी हातमिळवणी केली आहे. बुधवारी कोकण भवन येथे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे नेते राजू पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची गट नोंदणी पार पडली. या नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीत महायुतीसोबतच 'मनसे' सत्तेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 53 नगरसेवकांनी अधिकृत गट नोंदणी केली. मनसेच्या 5 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे 'नॉट रिचेबल' असलेले 4 पैकी 2 नगरसेवक मनसेच्या माध्यमातून या आघाडीत सामील होण्याची दाट शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या