महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा निकाल आज स्पष्ट झाला असून राज्याच्या राजकारणात भाजपने अभूतपूर्व 'महाविजय' संपादन केला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आपला दबदबा कायम ठेवला असून काही ठिकाणी भाजपला देखील मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. मात्र दुसरीकडे या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले होते. या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ठाकरे बंधूंनी मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच धरून ठेवला होता. असं असताना देखील ठाकरे बंधूंना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपने 89 जागा मिळवत ठाकरे बंधूंना धुळ चारली आहे.
हेही वाचा- Raj Thackeray On BMC Election Result 2026 : निवडणूक सोपी नव्हती, धनशक्ती विरुद्ध शिवशक्ती... राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या असून राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्या. त्यामुळे ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळाले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 89 आणि शिंदे सेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या महापौर पदावर भाजपचा दावा आहे. यानंतर आता मुंबईचा महापौर कोण होणार? याकडे संपूर्ण मुंबईकरांच लक्ष लागलेलं आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या सुरुवातीला भाजप नेत्यांकडून अनेकदा त्यांच्या सभांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मुंबईचा महापौर भाजपचा होईल तथा तो हिंदू होईल. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हेच वक्तव्य केलं होत की, मुंबईचा महापौर हिंदू होईल.
हेही वाचा- Maharashtra Mahapalika Elections 2026 : राज्यात भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक, MIM पक्षाने ठाकरे गट अन् मनसेलाही मागे टाकलं
मात्र त्यानंतर मराठी माणसाच्या अस्तित्वावरून केल्या जाणाऱ्या प्रश्नांकडे बघता भाजपने असं जाहीर केलं की, मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदू होईल. त्यानंतर आता महानगरपालिकांच्या रणधुमाळीत विजय मिळवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरचा निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत घेणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात नगरविकास खाते महापौर पदासाठी सोडत काढणार आहे. त्यामुळे जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता आहे.
me width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/_9SAiSNMG2E?si=s2Jn3vJCXUOk8Z72" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>