Tuesday, November 11, 2025 09:34:20 PM

Nana Patole On Mahayuti : 'निवडणूक आयोगाची वकिली करू नका'; नाना पटोलेंचा महायुतीला टोला

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला सवाल केले. 'महायुतीने निवडणूक आयोगाचं वकीलपत्र का घेतलंय?', असा सवाल नाना पटोलेंनी केले.

nana patole on mahayuti  निवडणूक आयोगाची वकिली करू नका नाना पटोलेंचा महायुतीला टोला

भंडारा: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला सवाल केले. 'महायुतीने निवडणूक आयोगाचं वकीलपत्र का घेतलंय?', असा सवाल नाना पटोलेंनी केले. 'लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही सत्तेचा माज करत आहात, हे चांगलं नाही. उद्या लोक तुम्हाला मारतील. नेपाळमध्ये घडलेली घटना आपण सर्वांनी पाहिलंच असेल. त्यामुळे स्वत:मध्ये इतका माज आणू नका आणि निवडणूक आयोगाची वकिली करू नका', असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं.

हेही वाचा: Imtiaz Jaleel: शनिवारवाड्यातील नमाज पठणावरुन तापलं राजकारण; इम्तियाज जलील यांचा भाजपावर जोरदार हल्ला

पुढे, नाना पटोले म्हणाले की, 'वास्तविकता काय आहे? हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे, आमचा ईव्हीएम मशीनवर आक्षेप नाही. याउलट, आमचा आक्षेप निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आहे. निवडणूक आयोग निश्चितच उत्तर देईल, आम्हाला तुमच्या उत्तराची अजिबात गरज नाही. ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक आयोगाची वकिली करत आहात, त्यामुळे, लोकांना संशय तुमच्याविरोधात वाढत आहे'.


सम्बन्धित सामग्री