Sunday, March 08, 2026 11:31:54 PM

Dr. Janardhan Waghmare Passes Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डॉ. जनार्दन वाघमारे हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक प्रगल्भ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ देखील होते. त्यांनी आयुष्यभर समाजकारण आणि साहित्याच्या माध्यमातून वंचितांचे प्रश्न मांडले.

dr janardhan waghmare passes away  ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे यांचे निधन 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Janardhan Waghmare Passes Away : महाराष्ट्राच्या साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व, माजी खासदार आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांचे लातूर येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
डॉ. जनार्दन वाघमारे हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक प्रगल्भ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ देखील होते. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आयुष्यभर समाजकारण आणि साहित्याच्या माध्यमातून वंचितांचे प्रश्न मांडले. त्यांच्या लेखणीने अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकला होता. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे मानले जाते, त्यांनी अनेक तरुण पिढ्यांना मार्गदर्शक म्हणून दिशा दिली.

हेही वाचा - Sudhakar Shrotri Passes Away: पुष्कर श्रोत्रीचे पितृछत्र हरपले; 89व्या वर्षी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

राजकीय प्रवास आणि समाजकार्य
डॉ. वाघमारे यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. लोकशाही मूल्यांची जोपासना आणि संविधानात्मक हक्कांसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला. प्रकृती खालावल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते, मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय आणि साहित्य विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांची आदरांजली
विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि, लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना आदरांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा - Chembur Accident : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार 


सम्बन्धित सामग्री