Monday, June 23, 2025 06:21:14 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा प्रकरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडला याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा प्रकरण

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विद्यापीठ प्रशासनासह सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विद्यापीठाच्या वसतिगृहात अशा प्रकारची घटना घडल्याने विद्यार्थी, पालक, आणि समाजामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गांजा जसे प्रतिबंधित पदार्थ वसतिगृहात कसे आले, यावरून प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता तपासली जात आहे. वसतिगृह हे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि शिक्षणासाठी अनुकूल वातावरणाचे स्थान असावे अशी अपेक्षा असते, मात्र अशा घटनांमुळे ते आता अधिक संशय निर्माण होत आहे . 

या प्रकरणामुळे विद्यापीठ प्रशासनावर वसतिगृहांमध्ये तपासणी प्रक्रिया कडक करण्याची आणि सुरक्षेचे उपाय अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. बाहेरील व्यक्तींच्या वसतिगृह प्रवेशावर नियंत्रण ठेवणे, विद्यार्थ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम राबवणे आणि नियमित तपासणी ही प्राथमिकता असावी.
विद्यापीठ हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून समाजाच्या विकासाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे अशा घटनांना वेळेत रोखण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनीही असे प्रकार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


सम्बन्धित सामग्री