Monday, February 16, 2026 11:17:11 AM

Gas Cylinder Explosion In Kandivali: कांदिवलीत गॅस सिलिंडरचा स्फोट; 7 जण गंभीर जखमी

हा स्फोट कांदिवली पूर्वेतील मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत बुधवारी सकाळी सुमारे 9:05 वाजता झाला. गॅस पाईप लीक झाल्यामुळे अचानक स्फोट झाला.

gas cylinder explosion in kandivali कांदिवलीत गॅस सिलिंडरचा स्फोट 7 जण गंभीर जखमी

Gas Cylinder Explosion In Kandivali: मुंबईच्या कांदिवली परिसरात बुधवारी सकाळी एक भीषण गॅस स्फोट झाला, ज्यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट कांदिवली पूर्वेतील मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत बुधवारी सकाळी सुमारे 9:05 वाजता झाला. गॅस पाईप लीक झाल्यामुळे अचानक स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळी आग लागली.

मुंबई अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. स्फोट ग्राउंड प्लस 1 मजल्याच्या दुकानात झाला, ज्यामुळे वीज जोडणी, एलपीजी सिलिंडर, रेग्युलेटर आणि गॅस स्टोव्ह यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हेही वाचा - Mumbai Rain Forecast: मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी; अरबी समुद्रात उच्च भरती-ओहोटीची शक्यता

जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, त्यांना ईएसआयसी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी बहुतेकांची शरीर 85 ते 90 टक्के भाजले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर MSRDC चा सौर ऊर्जा प्रकल्प; वीज निर्मितीस सुरूवात

जखमींमध्ये शिवानी गांधी (वय 51) ESIC रुग्णालयात उपचार घेत आहे, त्या 70 टक्के भाजल्या आहेत. नितू गुप्ता (वय 31) आणि जानकी गुप्ता (वय 39) देखील ESIC रुग्णालयात आहेत. त्यांना अनुक्रमे 80 टक्के आणि 70 टक्के भाजले आहे. मनराम कुमाकट (वय 55) यांनाही ESIC रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ते 40 टक्के भाजले आहेत. याशिवाय, रसिका जोशी (वय 47), दुर्गा गुप्ता (वय 30) आणि पुनम (वय 28) यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू असून, ते 90 टक्के भाजले आहेत. अधिकार्‍यांनी स्फोटाचे कारण तपासण्यासाठी तपास सुरु केला असून, घटनास्थळी सुरक्षा आणि बचाव उपाय सुनिश्चित केले जात आहेत.

 


सम्बन्धित सामग्री