Wednesday, June 25, 2025 12:37:21 AM

एका युजरच्या पोस्टने उडवली खळबळ; 98 फूट लांबीचा एनाकोंडा पाहून नेटिझन्स थक्क

30 मीटर लांब सापाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; एवढा प्रचंड एनाकोंडा पाहून नेटकरी चक्रावले.

एका युजरच्या पोस्टने उडवली खळबळ 98 फूट लांबीचा एनाकोंडा पाहून नेटिझन्स थक्क

Anaconda Video: सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दिसणारा साप एवढा प्रचंड आहे की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. हा साप म्हणजे एनाकोंडा प्रजातीचा असल्याचं सांगितलं जातंय, पण त्याची लांबी तब्बल 30 मीटर म्हणजे जवळपास 98 फूट असल्याचं म्हटलं जातंय. लोक या दृश्याला पाहून थक्क झालेत.

हा जबरदस्त व्हिडीओ @myhiddenvalue या ट्विटर युजरने शेअर केला असून, काही वेळातच त्याला लाखो व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. व्हिडीओमध्ये हिरवट तपकिरी रंगाचा, पाण्यातून सरपटत जाणारा प्रचंड मोठा एनाकोंडा दिसतो. तो इतका मोठा आहे की पाहताना वाटतं जणू डायनॉसॉरचं एखादं रूप आपल्या डोळ्यांसमोर आहे.

पण या व्हिडीओमागचं सत्य थोडंसं वेगळं आहे. हा साप प्रत्यक्षात अस्तित्वात नसून, तो AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेला आहे. याचा अर्थ, हा व्हिडीओ बनावट आहे, मात्र इतका वास्तवदर्शी की तो पाहताना तो खरा आहे की खोटा, हे लगेच समजणं अवघड होऊन जातं.

हेही वाचा: बॉलीवूडचे बादशाह झाले फिके; सलग 8 ब्लॉकबस्टर देऊनही चित्रपटांना केला रामराम, ओळखा पाहू कोण?

AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आज अशा प्रकारचे थरारक आणि वास्तव वाटणारे व्हिडीओ सहजपणे तयार करता येतात. आणि हा व्हिडीओ त्याचं उत्तम उदाहरण आहे. यामुळेच अनेक लोक फसले आणि काहींनी तर या व्हिडीओला खऱ्याचं प्रमाण मानून शेअर केलं.

तथापि, सत्य असं आहे की आजवर विज्ञानाला सापडलेला सर्वात मोठा एनाकोंडा केवळ 30 फूट लांब होता. या व्हिडीओमधील साप त्याच्या तीनपट मोठा आहे. म्हणजे तो प्रत्यक्षात अस्तित्वात असण्याची शक्यता शून्य आहे.

जगभरातल्या पौराणिक कथांमध्ये अशा भल्यामोठ्या सापांचा उल्लेख सापडतो. पण डायनॉसॉरसारखे वैज्ञानिक पुरावे मात्र या प्रकारच्या सापांसाठी आत्तापर्यंत कुठेही आढळलेले नाहीत. म्हणूनच, हा व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करत असला तरी त्यावर विश्वास ठेवण्याआधी थोडं तंत्रज्ञानाचं ज्ञान असणं गरजेचं आहे.

अशा व्हिडीओजमुळे एक गोष्ट मात्र नक्की समजते; AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्यात कुठल्याही कल्पनेला वास्तवाचं रूप देता येऊ शकते.

'>Anaconda Video


सम्बन्धित सामग्री






Live TV