दिवाळीच्या शुभदिनी सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार दिसून आले आहेत. देशभरात अनेक ठिकाणी सोने आणि चांदीचे भाव थोडे कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पारंपरिकदृष्ट्या दिवाळीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे आज अनेक जण बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर 5 च्या एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर करार 1,27,817 रुपयांवर (प्रति 10 ग्रॅम) ओपन झाला. मागील सत्रात तो 1,27,008 रुपयांवर बंद झाला होता. सकाळी 10 वाजेपर्यंत सोने 1,28,050 रुपयांवर ट्रेड होत होते, म्हणजेच मागील दिवसाच्या तुलनेत सुमारे 1,000 रुपयांची वाढ झाली होती. सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्सवरील सोने 1,28,556 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. दुसरीकडे, चांदीच्या दरात किंचित घट दिसून आली. डिसेंबर 5 एक्सपायरी असलेल्या कराराचा दर 1,59,875 रुपयांवर ओपन झाला, मात्र व्यवहाराच्या वेळी तो 1,56,751 रुपयांवर घसरला.
हेही वाचा : Medha Kulkarni: 'शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्यांना सोडणार नाही', खासदार मेधा कुलकर्णींनी दिला इशारा
देशातील प्रमुख शहरांतील सोने दरांमध्येही थोडाफार फरक दिसून येत आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 1,30,840 रुपये, तर 22 कॅरेट सोने 1,19,950 रुपये इतके आहे. मुंबईत हे दर अनुक्रमे 1,30,690 आणि 1,19,800 रुपये आहेत. चेन्नईत 24 कॅरेट सोने 1,30,040 रुपये, तर 22 कॅरेट सोने 1,19,200 रुपये आहे. कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 1,30,690 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 1,19,800 रुपये आहे. अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,740 रुपये, तर लखनौमध्ये 1,30,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
भारतात सोने आणि चांदीचे सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व मोठे आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशी हे दिवस विशेषतः सोनं खरेदीसाठी शुभ मानले जातात. गुंतवणूकदारांसाठीही सोने हे सुरक्षित आणि स्थिर पर्याय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात या मौल्यवान धातूंची मागणी वाढते. सोनं हे केवळ दागदागिन्यांसाठी नव्हे तर आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
या दिवाळीत सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये झालेली किरकोळ घट ग्राहकांसाठी चांगली बातमी ठरली आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देत अनेक लोकांनी देशात तयार होणारे दागिने आणि नाणी खरेदी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात बाजारपेठा पुन्हा एकदा सुवर्णमय झाल्या आहेत.
हेही वाचा : Saptashrungi Devi: सप्तशृंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी तब्बल 19 तास खुले असणार, दिवाळीसाठी मंदिर प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय