मुंबई: आज म्हणजेच 13 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मकर संक्रांतीच्या अवघ्या एक दिवस आधी झालेली ही घसरण गुंतवणूकदारांसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. कालच देशांतर्गत तसेच जागतिक बाजारात सोने-चांदीने नवे उच्चांक गाठले होते, मात्र आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. कॉमेक्सवर आज सोन्याचा दर घसरून 4603.70 डॉलर प्रति औंसवर आला असून, चांदीचा दरही खाली येत 84.105 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. देशांतर्गत बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोमवारी सोन्याचा भाव 1,41,991 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 2,68,153 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
दरांमध्ये घसरण झाली असली तरी सोने-चांदीचे दर अजूनही त्यांच्या उच्चांकी पातळीच्या आसपासच आहेत. आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,160 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,30,310 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 18 कॅरेट सोन्याचा दर 1,06,620 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. चांदीचा दर आज 2,70,100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा: Weather Alert: राज्यातील 'या' भागात ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा; मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाड्यात कसं असेल हवामान?
महानगरांतील दर पाहिले असता, दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,310 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,30,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 24 कॅरेट सोने 1,42,160 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 1,30,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोने 1,06,620 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे. भोपाळमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,160 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे.
चेन्नईमध्ये सोन्याचे दर तुलनेने जास्त असून तेथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,140 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,31,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 1,09,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. अहमदाबादमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,210 रुपये प्रति 10 ग्रॅम असून कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या तिन्ही शहरांमध्ये आज एक किलो चांदीचा दर 2,70,100 रुपये इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, नफावसुली आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू असून, आगामी दिवसांत दर कोणती दिशा घेतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Devendra Fadnavis Speech: "राज ठाकरेजी, तुम्हीही ऐकून घ्या..." हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर फडणवीसांनी सभेत पुराव्याचा कागदच फडकवला