गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या घरात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष आता एका वेगळ्या धातूने वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे आणि देशांतर्गत सराफा बाजारातही आज सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या...
हेही वाचा- Pimpri-Chinchwad : पिंपरीत खाकीचा अनोखा थाट! फुलांच्या माळांनी सजलेल्या पोलिसांच्या गाडीतून निघालं लग्नाचं वऱ्हाड
आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,55,000 च्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,44,550 पर्यंत पोहोचला आहे. स्थानिक कर आणि घाडणी शुल्क यामुळे शहरांनुसार या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो. तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर 22 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,48,000 ते 1,50,000 च्या दरम्यान आणि 24 कॅरेटसाठी अंदाजे 1,55,000 ते 1,60,000 च्या आसपास आहेत. मुंबई आणि पुण्यात भाव प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सुमारे 1,55,500 1,56,600 आहेत. नाशिक आणि नागपूरमध्येही हे दर जवळपास समान आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो 2,84,900 ते ₹2,85,000 च्या दरम्यान आहेत. ज्यात प्रति ग्रॅम चांदीचा दर साधारणपणे 285 च्या आसपास आहे. सोन्याच्या भावात वाढ झाली असून, जागतिक आणि स्थानिक घटकांमुळे हे दर उच्च पातळीवर पोहोचले आहेत.
हेही वाचा- Navnath Waghmare : तेलंगणामध्ये फुलेंचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न,नवनाथ वाघमारे यांची अमित शाह यांच्याकडे कारवाईची मागणी
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?
9 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असून, 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,48,450 तर 24 कॅरेट 1,55,600 इतके आहेत. तर पुण्यात 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1,48,000 तर 24 कॅरेट 1,55,580 इतके आहेत. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1,55,500 इतके तसेच 22 कॅरेट सोने 1,48,000 इतके आहेत. तर नाशिकमध्ये 22 कॅरेट सोने 1,48,000 आणि 24 कॅरेट सोने 1,55,500 इतके आहे. नागपूरमध्ये साधारणपणे नाशिक आणि मुंबईच्या दरांच्या आसपास असल्याचे समोर आले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत.