सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. भारतीय बाजारात सोन्याच्या घरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज सोन्याचे दर जाणून घ्या...
8 फेब्रुवारी 2026 रोजी, भारतातील सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी अंदाजे 15,660 प्रति ग्रॅम आणि 1,56,600 प्रति 10 ग्रॅम असे आहेत. तसेच 22 कॅरेटसाठी अंदाजे 14,355 प्रति ग्रॅम आणि 1,43,550 प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर अत्यंत उच्च पातळीवर आहेत. मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,46,000 ते 1,47,800 च्या दरम्यान आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम अंदाजे 1,53,700 ते 1,61,000 च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच चांदीचे भाव देखील वाढून प्रति किलो सुमारे 2,99,900 पर्यंत पोहोचले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 2,85,000 ते 3,00,000 च्या दरम्यान आहेत. 1 ग्रॅम चांदीची किंमत अंदाजे 285 ते 320 आहे.
हेही वाचा- 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'आनंदाची बातमी'; आठव्या वेतन आयोगाची प्रश्नावली प्रसिद्ध; 'या' प्रश्नांची उत्तरे द्या आणि पगारवाढ मिळवा?
जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?
8 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर असून, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,47,839 रुपये आणि 24 कॅरेट सोने 1,61,279 इतके आहेत. तर पुण्यात 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1,51,868 इतके आहेत. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 1,59,530 इतके तसेच 22 कॅरेट सोने 1,46,240 इतके आहेत. नागपूरमध्ये साधारणपणे नाशिक आणि मुंबईच्या दरांच्या आसपास असल्याचे समोर आले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलांमुळे चांदीच्या भावात चढ-उतार होत आहेत.