Saturday, June 14, 2025 03:55:25 AM

Gondia Crime: मद्यधुंद अवस्थेत इसमाला मारहाण केल्याने पोलीस निलंबित

मद्यधुंद पोलिसाने भरचौकात इसमाला मारहाण केली आहे. ओव्हरटेक केल्याने पोलिसाचा संताप झाला आणि त्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली.

gondia crime मद्यधुंद अवस्थेत इसमाला मारहाण केल्याने पोलीस निलंबित

गोंदिया: मद्यधुंद पोलिसाने भरचौकात इसमाला मारहाण केली आहे. ओव्हरटेक केल्याने पोलिसाचा संताप झाला आणि त्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना 19 मे रोजी घडली असून मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. सदर घटना गोंदियात घडली आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभाग सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत असून पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेआहे. जिल्ह्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत कांचन राहुले हा पोलीस कर्मचारी रस्त्यावर जात असताना छत्तीसगड राज्यातील एका व्यक्तीने कट मारून ओव्हरटेक केल्याच्या आरोप करून त्याला कपडे फाटेपर्यंत मारलं. सदर घटना ही 19 मे रोजी घडली आणि संबंधित प्रवाशांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावर गोंदिया पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत त्वरित संबंधित पोलिसाला निलंबित केलं. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हयगय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तर छत्तीसगड राज्यातील प्रवाशाने चुकीच्या पद्धतीने मला मारहाण केल्याचे म्हटले आहे. आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलीन झाल्याचा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीतून बडतर्फ करावं अशी मागणी छत्तीसगडमधील मारहाण झालेल्या व्यक्तीने पोलीस विभागाकडे केली आहे.

हेही वाचा : Palghar Crime: अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

छत्तीसगड राज्यातील एका व्यक्तीला मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण करण्यात आली. छत्तीसगड राज्यातून गोंदियात आलेल्या प्रवाशाने ओव्हरटेक केल्यामुळे पोलिसाचा संताप झाला आणि याच रागाच्या भरात त्याने प्रवाशाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे सध्या गोंदियातील पोलीस विभाग चर्चेत आहेत. तसेच संबंधित पोलिसाला देखील निलंबित करण्यात आले आहे. 


सम्बन्धित सामग्री