Saturday, July 12, 2025 12:37:05 AM

कोल्हापूरच्या सब जेलमध्ये वाढीव दराने वस्तू विक्री

कोल्हापुरातील सब जेलमध्ये एका न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयिताने ही माहिती दिली. 'कारागृहात दहा रुपयांची वस्तू पाचशे ते हजार रुपयांना विकली जाते', असा खुलासा बाहेर पडलेल्या आरोपीने केला आहे.

कोल्हापूरच्या सब जेलमध्ये वाढीव दराने वस्तू विक्री

अमरसिंह पाटील. प्रतिनिधी. कोल्हापूर: 'जगात भारी आम्ही कोल्हापुरी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील बिंदू चौक येथे असलेल्या सब जेलमध्ये एका न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयिताने ही माहिती दिली. 'या कारागृहात दहा रुपयांची वस्तू पाचशे ते हजार रुपयांना विकली जाते', असा धक्कादायक खुलासा बाहेर पडलेल्या आरोपीने केला आहे.

कोल्हापुरातील बिंदू चौक येथील सब जेलमध्ये न्यायालयीन कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीने हा धक्कादायक खुलासा केला आहे. 'कारागृहात दहा रुपयांची वस्तू पाचशे ते हजार रुपयांना विकली जाते', असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. पुढे त्याने खुलासा केला की, 'तंबाखूही इथे गुप्तपणे मिळतो, कांदा, चिरमुरे यांसारख्या जीवनावश्यक वस्तू वाढीव दराने कैद्यांना पुरवल्या जातात. हे सर्व व्यवहार अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालतात'. हा प्रकार समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: 60 वर्षीय वयोवृद्ध आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून नातू फरार

20 जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कारागृह घोटाळ्याचा पर्दाफाश केला. 'राज्यातील कारागृहात गेल्या 3 वर्षांत सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाला आहे', असा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे घोटाळ्यातील प्रमुख कारनामे उघडकीस आले आहेत. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचाही घोटाळ्यात सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. यादरम्यान, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तेजस मोरे यांचे सुपेकर यांच्याशी कनेक्शन आहे', असा आरोपही राजू शेट्टींनी केला.

या संदर्भात राजू शेट्टींनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि गृह सचिवांकडे लेखी चौकशीची मागणी केली. 'मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ न देता टाळाटाळ केल्याने संशय वाढला आहे', असेही ते म्हणाले. मुख्य सचिव आणि गृह सचिवांनी सांगितले की, 'हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर आहे'. पुढे राजू शेट्टी म्हणाले की, 'राज्यातील कारागृहांमध्ये रेशन, कँटीन साहित्य आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. गहू, तांदूळ, साखर, दाळ यासारख्या वस्तू बाजारभावापेक्षा कित्येक पटींनी जास्त किमतीत खरेदी केल्या गेल्या'.


सम्बन्धित सामग्री